कोल्हापूरच्या तरुणीला परदेशात 42 लाखांचे पॅकेज, जगप्रसिद्ध Adobe कंपनीमध्ये काम करण्याची संधी
Kolhapur : बेरोजगार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांवर दररोजच सोशल मीडियावर खिल्ली उडवणारे अनेक मिम्स पाहायला मिळतात. पण कोल्हापुरातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने अशा सर्वच खिल्ली उडवणाऱ्यांचं तोंड बंद केलंय. कोल्हापुरातल्या विद्यार्थिनीला जगप्रसिद्ध 'ॲडोब' कंपनीने तब्बल 41 लाखांचं पॅकेज देत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड केली. अमृता विजयकुमार कारंडे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. कोल्हापुरात आजपर्यंत इंजिनिअरिंग केल्यानंतर इतक्या मोठ्या पगाराची नोकरी कोणाला मिळाली नाहीये. एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला 41 लाखांचे पॅकेज दिलेली ही पहिलीच घटना आहे. अमृताचे वडील विजयकुमार कारंडे हे रिक्षा चालक असून अमृताची आई राजश्री कारंडे या गृहिणी आहेत.



















