एक्स्प्लोर
Pandharpur Mahapuja: 'कार्तिकी एकादशी: बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी शिंदेंची विठ्ठलाकडे प्रार्थना
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सपत्नीक संपन्न झाली. 'बळीराजाला सुखाचे दिवस आणू दे आणि हा पाऊस बंद होऊ दे,' असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातले. यावेळी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रामराव वालेगावकर आणि सुशीलाबाई वालेगावकर या वारकरी दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून वारी करत आहे. या पूजेवेळी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हेही उपस्थित होते. यावर्षी प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन मुलांनाही या महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















