एक्स्प्लोर
Jogeshwari Negligence: 'नो बेल ओन्ली जेल', संस्कृती कोटियनच्या न्यायासाठी नागरिकांचा आक्रोश
जोगेश्वरी पूर्व येथे श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या (Shraddha Construction) निष्काळजीपणामुळे सिमेंट ब्लॉक डोक्यात पडून २२ वर्षीय संस्कृती कोटियनचा (Sanskruti Kotian) मृत्यू झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी बिल्डरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी कँडल मार्च काढला. 'नो बेल ओन्ली जेल', अशा घोषणा देत नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांविरोधात जोरदार निदर्शने केली. संस्कृतीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी आपण मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन अमित साटम यांनी दिले आहे. या घटनेनंतर, मेघवाडी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला असून, एका इंजिनिअर आणि साईट मॅनेजरला अटक केली आहे. मात्र, बिल्डरला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















