एक्स्प्लोर
Honey Trap: आमदार Shivaji Patil यांना अडकवण्याचा कट, 'त्या' बहीण-भावाला अटक
चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील (Shivajirao Patil) यांना हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले असून, या प्रकरणी ठाणे पोलिसांनी कोल्हापूरमधून एका बहीण-भावाला अटक केली आहे. आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात (Chitalsar Police Station) यासंबंधी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आमदार पाटील यांना अश्लील फोटो आणि मेसेज पाठवून १० लाखांची मागणी करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथून मोहन पवार आणि शामल पवार या बहीण-भावाला अटक केली. ही फसवणूक आर्थिक फायद्यासाठी होती की यामागे काही राजकीय हेतू होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















