Jalgaon :रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून वाहनावर दगडफेक : ABP Majha
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि मुक्ताईनगचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातला वादा शिगेला पोहोचलाय अशातच रोहिणी खडसे मुक्ताईनगर इथे येत असताना सुतगिरणी भागात काही अज्ञातांनी त्यांच्या यांच्या वाहनावर दगडफेक केली आणि लोखंडी रॉडच्या सहाय्यानं हल्ल्याचाही प्रयत्न झाला. सोमवारी दुपारी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात आपलं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होतोय असं वक्तव्य केलं होतं. आणि त्याच दिवशी रात्री रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा आता तपास सुरू केला असून आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या हल्ल्याचा निषेध करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
