Coronavirus | पत्नीच्या प्रेमापोटी आजोबांनी केला 70 किलोमीटर घोड्यावरून प्रवास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातही सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सुविधा बंद आहेत. संचारबंदीमुळे सर्व प्रकारची खासगी आणि सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे काही लोकांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करता अडचणींना सामोरे जावं लागतं आहेत.
देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला पाहायला मिळतात. सोलापूर जिल्ह्यात ही असाच एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला. अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याने आपल्या पत्नीसाठी चक्क घोडेस्वारी करत 70 किलोमीटरचा प्रवास केला आहे. हे घोडेस्वारी करण्याचं कारण संचारबंदीमुळे सोालापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसेच खासगी वाहतूक ही ठप्प झाली आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांनी पेट्रोल देण्यासही बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो लोकांना अनेक दैनंदिन समस्यांना सामोरे जावे लागत आहे.