एक्स्प्लोर
Women's World Cup Final: विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भारतीय महिला संघाला शुभेच्छा
आज तमाम भारतीयांच्या नजरा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील (DY Patil) स्टेडियमकडे लागल्या आहेत, जिथे भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women's Cricket Team) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) विश्वचषक २०२५ (World Cup 2025) चा अंतिम सामना खेळणार आहे. 'आजच्या सामन्यामध्ये भारतीय महिला हे दाखवून देतील पूर्ण जगाला की हम किसीसे कम नहीं', हाच आत्मविश्वास घेऊन कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) मैदानात उतरतील. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला उपांत्य फेरीत पराभूत करून आणि विश्वविक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करून टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण देशातून संघाला शुभेच्छा मिळत असून, पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी भारतीय महिला संघ आतुर आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















