Nirbhaya Squad : निर्भया पथक नेमकं काम कसं करतं?, मदत मिळवायची कशी ? ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांच्या भांडणात महिलांसंदर्भात एक मुद्दा ऐकतोय तो म्हणजे निर्भया पथकाचा. विरोधी पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीच्या काही महिला नेत्यांकडून निर्भया निधीचा वापर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकरता करण्यात येतोय असे आरोप झाले. निर्भया पथकासाठी नियोजित निधीतून खरेदी करण्यात आलेली वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जात असल्याचे आरोप शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी पत्रकार परिषद घेत केला. त्यानंतर सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत यांनीदेखील याच आरोपांना दुजोरा दिला. सहाजिकच सत्ताधाऱ्यांकडूनदेखील या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं गेलं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील या निर्भया पथकाच्या गाड्या मविआ सरकारच्या काळात नेत्यांकरता वापरण्यात आल्याचे आरोप केले. ....पण या राजकारणाच्या पलिकडे मुद्दा तसाच राहिला...महिला सुरक्षेचा.. निर्भय पथकच मुळी महिला सुरक्षा यंत्रणेचा एक महत्वाचा भाग आहे. पण तु्म्हाला माहित आहे का की हे निर्भय पथक नेमकं काम काय करतं, काम कसं करतं..? निर्भया पथकाची निर्मिती केव्हा झाली आणि गरजेला या पथकाची मदत कशी घ्यायची ? पाहूयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओच्या माध्यमातून