(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HM Dilip Walse Patil : Devendra Fadnavis यांना 6 वेळा नोटीस तर दोनदा प्रश्नावली पाठवण्यात आली
''राज्य विभागाची गोपनीय माहिती बाहेत गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याप्रकरणी 5 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्यांचा संबंध आहे, त्यांचा जबाब घेणं गरजेच आहे. देवेंद्र फडणवीस यांना 6 वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा अर्थ समनस असा होत नाही. फडणवीस यांनी काही बदल्यांबाबतची माहिती समोर आणली, त्याबाबत माहिती घ्यायची होती. त्यांना याआधी देखील दोनदा प्रश्नावली पाठवण्यात आली आहे.'' असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी सुरु आहे. याविरोधात राज्यभरात भाजप कार्यकर्ते आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.