Thackeray Wedding : भाजप नेत्याची मुलगी होणार ठाकरेंची सून, 28 डिसेंंबरला पार पडणार विवाह सोहळा
माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांचा विवाह 28 डिसेंबर रोजी निहार ठाकरे यांच्याशी होणार आहे.. निहार ठाकरे हे बिंदुमाधव ठाकरे यांचे पुत्र आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आणि लग्नाचे निमंत्रण दिले. येत्या 28 डिसेंबरला मुंबईमध्ये निहार ठाकरे आणि अंकिता पाटील यांचा विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे.. निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.. निहार यांच्या वडील बिंदुमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत, तर राज ठाकरे हे त्यांचे सख्खे चुलत काका आहेत.. निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत. अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. अंकिता पाटील या काँग्रेसच्या काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या असल्या तरी गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपशी जवळीक साधली आहे.. ठाकरे-पाटील विवाहामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.