Gudi Padwa ShobhaYatra 2023 : शोभायात्रावर अवकाळी पावसाचे ढग, 120 फूट रांगोळीचा चिखल : ABP Majha
शोभायात्रांवर पावसाचं सावट आहे.... आणि त्यामुळे तुम्ही उद्याची तयारी केली असेल पण उत्साहावर पावसाचं विरजण पडायला नको.... उद्याही हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यामुळे शोभायात्रांमध्ये मराठमोळा पोशाख करून, बुलेटवरून शोभायात्रा काढणाऱ्या महिलांपुढे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. त्याचसोबत, चौकाचौकात सणांचं मांगल्य वाढवणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांचं काय होणार? असे अनेक प्रश्न विचारले जातायत. सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह असताना, महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यातच, गुढीपाडव्यासाठी खरेदीची लगबग सुरू असताना पावसाने अचानक हजेरी लावलीय. त्यामुळे अनेकांची त्रेधा तिरपीट उडालीय. उद्याच्या गुढीपाडव्यावरही पावसाचं सावट आहे. अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे लोकांच्या उत्साहाची गुढी तर उभी राहिल, मात्र ती पावसाने भिजू नये, अशीच अपेक्षा सर्वजण करतायत.