Chhagan Bhujbal : OBC आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांची सही
Chhagan Bhujbal : महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यामद्ये छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसी राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, असे भुजबळ म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता. आता त्या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.






















