एक्स्प्लोर
Dombivli Snakebite Deaths | शास्त्री नगर रुग्णालयावर कारवाई, दोन Doctors निलंबित!
डोंबिवली नगरीतील एका गावात सर्पदंशामुळे चार वर्षांची चिमुरडी प्राणवी भोईर आणि तिची तरुण मावशी श्रुती ठाकूर यांचा धक्कादायक मृत्यू झाला. या प्रकरणात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी केडीएमसीच्या शास्त्री नगर रुग्णालयावर मोर्चा काढला. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष या मोर्चात सहभागी झाले होते. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपचारांमध्ये निष्काळजीपणा केल्याचा आरोप असलेल्या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर संजय जाधव यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नागरिकांच्या संतप्त भावनांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
धाराशिव
राजकारण
Advertisement
Advertisement

















