एक्स्प्लोर
Goa Diwali: गोवा नरकासुर दहनाने उजळला, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव
गोव्यात (Goa) दिवाळीची (Diwali) सुरुवात नरकचतुर्दशीच्या पहाटे नरकासुर (Narakasura) दहनाच्या परंपरेने झाली. उत्तर भारतात दसऱ्याला रावणाचे दहन होते, त्याचप्रमाणे गोव्यात दिवाळीला नरकासुराच्या दहनाची प्रथा असून, ती वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानली जाते. या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी नरकासुराच्या भव्य आणि अक्राळविक्राळ प्रतिकृती उभारल्या जातात आणि मिरवणुका काढल्या जातात. तरुण मंडळे अनेक आठवड्यांपासून या प्रतिकृती तयार करण्याच्या कामात गुंतलेली असतात आणि अनेक ठिकाणी स्पर्धांचेही आयोजन केले जाते. नरकचतुर्दशीच्या पहाटे या नरकासुरांच्या प्रतिकृतींचे दहन करून दीपोत्सवाला सुरुवात होते, जो गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















