Dilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?
Dilip Lande vs Sunil Shinde : अधिवेशनात 'तो' मुद्दा गाजला! दोन्ही शिवसेना एकत्र यैणार...?
लातूर (Latur) जिल्ह्यातील तळेगाव (Talegaon) हे 150 उंबऱ्याचे गाव आहे. या गावातील सर्वजण शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, या गावातील 75 टक्के जमिनीवर वक्फ बोर्डने (Waqf Board) दावा केला आहे. गावातील 103 शेतकऱ्यांचा 300 एकर जमिनीचा यात समावेश आहे. यामुळं आता अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये भीतीचं वातावरण परसलं आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे आता वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या वक्फ न्यायाधीकारण्यात याचिकाकर्ते पटेल सय्यद इरफान याच्या अर्जावरून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास 103 शेतकरी व महाराष्ट्र शासन यांना 30 मे रोजी नोटीस बजावण्यात आल्या. एकाच वेळी 103 शेतकऱ्यांना नोटीस आल्याने अनेकांनी वकिला मार्फत आपले म्हणणे सादर केले आहे. यावर आता 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, या नोटीसशी वक्फ बोर्डाचा कुठलाही संबंध नसल्याचे आता वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे.