एक्स्प्लोर

Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्य

Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्य
बीड : जिल्ह्यातील मसाजोग गावच्या सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी तपासाचा मुद्दा उपस्थित करत थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन गावकऱ्यांचा संशय असल्याचे म्हटले. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंकडेही बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देत याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांवरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. आता, यावरच देशमुख यांच्या भावाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. राजकारण्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून बीड जिल्ह्यात जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आणि ओबीसी अशी विभागणीही येथील काही गावांत दिसून आली होती.   सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच, आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत हा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यावर, फडणवीसांनी माहिती देताना, याप्रकरणी एसआयटी नेमली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. आता, धनंजय देशमुख यांनीही एसआयटीवर विश्वास ठेवावा लागेल, असे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात SIT नेमली असून त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ते लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करतील. तर या प्रकरणात जातीवादाचा काहीच संबंध येत नाही, असं देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे, याप्रकरणाला जातीय रंग देण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा असल्याचे धनंजय देशमुख यांनी सूचवले आहे. मात्र, याप्रकरणात राजकीय किंवा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबावातून चालढकलपणा किंवा काहींना सूट देण्याचा प्रकार घडतोय का, याचीही चर्चा जिल्ह्यात होत आहे.   

महाराष्ट्र व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्य
Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्य

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्यTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्या : 16 December 2024 : ABP MajhaAmol Mitkari : मंत्रिमंडळातून भुजबळांचा पत्ता कट, मटिकरींचा Jitendra Awhad यांच्यावर पलटवारPrakash Ambedkar Speech : पोलिसांच्या कारवाईवर संशय, सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यसंस्काराला थांबणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही; विधिमंडळात पडसाद, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
मुख्याध्यापकाकडून शरीर सुखाची मागणी, शिक्षिकेचं आंदोलन; खंडणीसाठी उठाठोप केल्याची तक्रार
Embed widget