Mumbai Rape Case : नराधमांना फाशीच झाली पाहिजे : Devendra Fadnavis
Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साकीनाक्यात घडलेला हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. ज्याप्रकारे गेल्या महिन्याभरात बलात्काराच्या घटना घडत आहेत, त्याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. राज्यात विविध ठिकाणी अशा घडत आहेत. अतिशय भयंकर अशा या घटना आहे. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात अशा घडल्यानं लौकिकाला धक्का पोहोचतो. हा प्रकार तर माणुसकीला काळिमा फासणारा आहे. आमची मागणी आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा, फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावं. आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. शक्ति कायद्यासंदर्भात बैठकांवर बैठका चालल्या आहेत. अशा केसेस फास्टट्रॅक कोर्टातही चालवल्या जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाला अशी विनंती करावी, असंही ते म्हणाले. महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यासाठी सरकारला वेळ नाही, असं ते म्हणाले.
![BJP On Mahapalika Election | मनपात भाजपची स्वबळाची वाट, शिंदेंचा युतीसाठी आग्रह? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8543e88a688f2ba365a7cfefca6c86781739644857936718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Job Majha : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिकल सर्विस लि. येथे नोकरीच्या संधी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/97e7a19c7a49700e5312838b1ed8655a1739631013939718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma On Dhananjay Munde : संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/c65b297debb8c3a69e480086c8298e7d1739630950691718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4178e3861c5305a926100bc8ef1636a41739628665995718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Shiv Sena Uddhav Thackeray Group Meeting : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांशी चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5567e57a226bf084967035ae3beecf271739622318548718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)