(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepak Kesarkar On Heavy Rain : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी केसरकरांची घोषणा
Deepak Kesarkar On Heavy Rain : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी केसरकरांची घोषणा
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची घोषणा
नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले होते, त्यामुळे हार्बरवर अनेक रेल्वे उशिराने धावत होत्या तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यातच अनेक तासापासून बेलापूरवरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. गर्दीत महिलेचा पाय घसरून रेल्वे रुळावर पडली आणि तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला. सततच्या पावसामुळे मुंबईच्या आकाशातील दृश्यमानता कमी झाली आहे. याचा परिणाम मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवरही झाला आहे. आतापर्यंत जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्या आहेत.