एक्स्प्लोर
Cyclone Tauktae : वडराईजवळ समुद्रात अडकलेल्या जहाजा मधून तेलगळती, मासेमारीवर परिणाम
तौक्ते चक्रीवादळामुळे 18 मे रोजी अलिबाग येथील भरकटलेलं जहाज पालघर मधील वडराई समुद्रकिनार्यालगतच्या खडकावर आदळलं असून हे जहाज तब्बल अकरा दिवसानंतर ही याच ठिकाणी आहे . मात्र हे जहाज खडकावर आदळल्याने या जहाजातील अनेक भाग हे फुटले असून या जहाजातील डिझेल आणि ऑइल याची गळती सध्या समुद्रात सुरू असून या गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले आहेत . याचा विपरीत परिणाम पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर होऊ लागला आहे . समुद्रात या जहाजातून मोठ्या प्रमाणावर ऑइल आणि डिझेल ची गळती सुरू असून समुद्रकिनाऱ्यालगत जाळ्याच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या मासेमारी वर याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत . या महाकाय जहाजात 80 हजार लिटर पेक्षाही अधिक डिझेल असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून देण्यात आली आहे. या जहाजाचे अनेक भाग हे निकामी झाले असून या होणाऱ्या गळतीमुळे परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर तेलाचे तवंग निर्माण होऊ लागले आहेत .
महाराष्ट्र
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
आणखी पाहा





















