Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 19 ऑगस्ट 2024
मराठा आरक्षणात आडकाठी आणल्याचं शिंदेंनी सांगितलं तर राजकारण सोडेन, जरांगेंच्या आरोपांंवर फडणवीसांचा पलटवार, तर मराठा आरक्षणासाठी फडणवीसांची मोलाची भूमिका, शिंदेंचं वक्तव्य
मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली हे नाकारुन चालणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया, भुजबळांना फडणवीसांनीच बळ दिल्याचाही आरोप
गोवा हायवे पूर्ण न करणारे रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री, रामदास कदमांचा हल्लाबोल, तर कदम अनाड्यासारखं बोलतात, चव्हाणांचं प्रत्युत्तर
विधानसभेत योगेश कदम आणि लोकसभेत सुनील तटकरेंना पाडण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी रसद पुरवली, रामदास कदमांचा गंभीर आरोप,
अजित पवारांच्या यात्रेत नवाब मलिक सहभागी होणार असल्यानं चर्चांना उधाण, निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस ठाम
अजित पवारांच्या मंचावरुन काँग्रेसच्या झिशान सिद्दिकींची स्वपक्षावरच आगपाखड, "मोहब्बत की दुकान"वरुन पक्षनेतृत्वावरच टीका, राष्ट्रवादीत जाण्याचेही स्पष्ट संकेत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे विश्वासघातकी, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका, रायगडमधल्या महायुतीत वादाची ठिणगी
संभाजी भिडे कॉमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का?, संभाजी भिडेंवरच्या प्रश्नावर पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल, मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावरुन भिडे वादाच्या भोवऱ्यात
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची, लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवत महाविकास आघाडीचं टीकास्त्र
मी येवला मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, छगन भुजबळांची घोषणा, वळसे पाटलांनंतर आता भुजबळांकडूनही स्वत:च्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
आधी मुलाच्या गळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उपरणं, आता सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमस्थळी वडिलांचा फोटो, अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या झिरवाळांच्या भूमिकेनं राजकीय चर्चांना उधाण
रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून अजित पवारांकडून लाडक्या बहिणींना शुभेच्छांचे मेसेज, राजकीय बळ देण्याचंही आवाहन, विधानसभेआधी अजितदादांच्या हायटेक यंत्रणेनं कंबर कसली
कल्याणीनगरमधील अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळावी यासाठी अगरवाल कुटुंबीयांचा बालन्याय मंडळात अर्ज, २८ तारखेला निकाल.
पोलीस चौकीतच कर्मचाऱ्यांकडून जुगाराचा अड्डा, नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमधला धक्कादायक प्रकार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडं लक्ष
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग, पुणे आणि नाशिकमधले रस्ते जलमय, अकोल्यातल्या अकोट तालुक्यातही ढगफुटीसदृश पाऊस
विठ्ठलाच्या दर्शनासाठी कोणीही पैसे देऊ नये, पंढरपूरच्या मंदिर विश्वस्तांचं आवाहन, ठाण्याच्या भाविकाला चार हजार रुपये मागितल्याच्या एबीपीच्या बातमीनंतर विश्वस्तांना जाग...