![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Construction News : बांधकाम बंद ठेवण्याचा क्रेडाईनं का दिला इशारा? काय आहे कारण?
स्टील, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याचे दर आता गगनाला भिडले असल्याने बांधकाम व्यावसायिकांना घरे बांधणे परवडत नाही, त्यामुळे बांधकाम बंद ठेवण्याचा इशारा क्रेडाई महाराष्ट्रने दिला आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि मेट्रो सेस याचा थेट परिणाम गृह खरेदीदारांवर होणार असल्याचे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी शुक्रवारी सांगितले. बांधकाम साहित्यापैकी महत्त्वाचा घटक असलेले स्टील, सिमेंट, चार इंचाच्या विटा, वाळू आणि वॉश सॅण्ड, इलेक्ट्रिक वायर, फिटिंग्स, टाईल्स, पाईप, सॅनेटरी वेअर, फॅब्रिकेशन, रेती, गौण खनिज, मुरूम, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजुरी यात साधारणत: 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ही वाढ नैसर्गिक आहे,की साठेबाजी किंवा नफेखोरीमुळे होत आहे, याची सरकारी यंत्रणांनी पडताळणी करावी. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सामान्य गृह खरेदीदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी फुरडे यांनी केली आहे. पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर येथील सर्व मालमत्ता खरेदीवर १ एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार पुन्हा लागू होण्याची शक्यता असून संघटनेचा त्याला विरोध आहे.
घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांवर अधिभाराचा थेट परिणाम होणार आहे.
![Top News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/e83c9fc4583e8a551a3023370c1ccb37172015723186990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/898f2aacb265d2dcd7155eba0ccb6d1f172015403903490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b802c4f8229a4717538f84083bb0076d172015347359790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/4f851fe5184971e3eb2409fc81af32ce172014968155490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/ac914aaeba5972429cf152906af4c531172014721230390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)