Corona Update :महाराष्ट्रातल्या कोरोना काळातल्या मृतांचा आकडा, कोरोनाचा स्फोट 'माझा'चा गौप्यस्फोट
महाराष्ट्र राज्य सांख्यिकी विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या कोरोना काळातल्या मृतांचा आकडा... हा कोरोनापूर्व मृतांच्या सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट असल्ल्याचं समोर आलं आहे.. आम्ही 2018 ते 2021 या तीन वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर, कोरोना काळामध्ये नोंदवले गेलेल्या मृतांचा आकडा हा भयंकर असल्याचं समोर आलं... असं असतानाही, राज्य सरकारने मात्र कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा हा नाममात्र दाखल्याचंही समोर आलं आहे... 2021 च्या मे महिन्यात सर्व प्रकारे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा सव्वा लाखांच्या घरात असताना, त्याच महिन्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा हा केवळ 20 हजारांच्या आसपास कसा... असाही प्रश्न निर्माण होतो...





















