Congress on MVA Seat Sharing : काँग्रेसला फक्त 13 जागा मिळणार? चर्चेनंतर कार्यकर्ते आक्रमक
Congress on MVA Seat Sharing : काँग्रेसला फक्त 13 जागा मिळणार? चर्चेनंतर कार्यकर्ते आक्रमक
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागावाटपाच्या फॉर्म्युलाचे दोन पर्याय तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला २२-१६-१० असा राहिल. त्यानुसार ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर लढण्याची शक्यता आहे. वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास, २०-१५-९-४ हा जागावाटपाचा फॉर्म्युला राहिल. त्या परिस्थिती ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ आणि वंचितला चार जागा देण्यात येतील. वंचितला ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा देण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे आता मविआचं लक्ष आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या शेतकरी स्वाभिमानी पक्षाला मविआ बाहेरून पाठिंबा देणार आहे. तसंच सांगलीची जागा ठाकरे गटाला, तर रामटेक आणि जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महादेव जानकरांच्या रासपला देण्यात येणार आहे.