(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Commission Of Backward class : सरकारनं नेमून दिलेल्या मुद्द्यांवरच आयोग सर्वेक्षण करणार !
Commission Of Backward class : सरकारनं नेमून दिलेल्या मुद्द्यांवरच आयोग सर्वेक्षण करणार ! सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न राज्यभरात ऐरणीवर आलाय. याच आरक्षणातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण. यावरूनच मराठा समाज मागास आहे की नाहीये? यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र, याच सर्वेक्षणावरून राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांत मत-मतांतरं आणि वैचारिक गोंधळ पहायला मिळतोय.आयोगाचे सदस्य न्यायमुर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी मराठा समाजातील ओबीसीमध्ये असलेल्या जातींचं सर्वेक्षण होणार नाहीय असं म्हटलंय. तर दुसरे सदस्य लक्ष्मण हाके यांनी मराठा जातीचं सर्वेक्षण होणार असल्याचं म्हटलंय. यावरून मराठा समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण आहेय. याच पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी...