(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिल्पकार कुणाचा? सवाल विरोधकांचा
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : शिल्पकार कुणाचा? सवाल विरोधकांचा
छत्रपती शिवारायांच्या पुतळ्यासोबत घडलेल्या घटनेला जबाबदार कोण? कलाकार कि व्यवस्था?
सिंधुदुर्गमध्ये घडलेल्या घटनेनंतर जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांच्याशी खास बातचीत
आदी शंकराचार्यांचा 108 फुटी पुतळा करताना काय काय तांत्रिक गोष्टी पाहिल्या गेल्या?
छत्रपती शिवारायांचा पुतळा बनवताना कुठे नेमकी चूक झाली?
Tic : भगवान रामपुरे, विख्यात शिल्पकार
---
कलावंत म्हणून माझ्यासाठी अत्यंत शरमेची बाब, मान खाली घालायला लावणारी घटना
15 फुटा पेक्षा जेव्हा जास्त उंची असते तेव्हा शिल्पकार सोबत इंजिनिअरिंगचे काम ही जास्त महत्वाचे होते
स्टीलचे रॉड उत्तम दर्जाचे असावेत, पुतळ्याची जेवढी उंची तितका भक्कम पाया असावा लागतो
108 फुटी शंकराचार्यांचा पुतळा करताना L&T कंपनीसोबत काम केल, या पुतळ्यासाठी 80 फूट पाया केला
उंच पुतळा करताना जमीन सर्व्हे केले जाते, जमिनीत मुरूम किती, खडक किती याचा विचार होतो, भूकंप झाला तर परिणाम होऊ नये याचा विचार केला जातो
भुगर्भमध्ये खडक किती पाणी किती हे सर्टिफाय केल्यावरच काम केले जाते
आम्हाला शंकरचार्यांचा पुतळा करताना पाया 500 वर्ष काही होणार नाही याची गॅरेंटी मागितली होती, तज्ञांनी 700 वर्ष काही होणार नाही हे सर्टिफिकेट दिल्यानंतरच काम सुरु केलं
जर 45 किलोमीटर वेगाने जर वारे येत असतील तर त्याचा विचार आधीच व्हायला हवा होता
चूक केवळ शिल्पकारची नाही, शासकीय कामात निविदा मागवतात, जी रक्कम सर्वात कमी त्याला काम देतात
कामाचा दर्जा न पाहता केवळ रक्कम कमी किती हे पाहायला जातं, म्हणून मी महापालिकेचे काम करायचे नाहीच हे ठरवलं
2003 साली मी सोलापुरात झान्सी च्या राणीचे पुतळा केला, दोन पायावर असलेला हा पुतळा असून ही इतके वर्ष टिकून आहे
नंतर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ही केला, मात्र बिल देताना पालिकेत अनेक टेबलवर कमिशन मागण्यात आली
ह्या घटनेत ही तेच असण्याची शक्यता आहे, शंभर टक्के यात भ्रष्टाचार झाल असेल
या घटनेला शासन ही तितकंच जबाबदार आहे, अनुभवी कलाकार असणे हे गरजेचे होते
चार-पाच महिन्यात पुतळा करा, आमचे साहेब येणार आहेत उदघाट्नला, निवडणूक आहे त्यात जाहिरात करता येईल असं म्हटले जाते, शासन कुठलं ही असलं तरी हे होतच
उदघाट्नची वेळ आधी ठरलेली असते आणि त्या वेळेत काम करण्यासाठी घाई होते
चांगले कलावंत हे कमी पैशात उपलब्ध होत नाही, त्यासाठी वेळ देणे हे तितकेच महत्वाचे