(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal Threat Call Recording : मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी
Chhagan Bhujbal Threat Call Recording : मंत्री छगन भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी
Death Threat To Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यानं छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीनं मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्व तपशी घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलनं मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे.