Chhagan Bhujbal On Manoj Jarange : जेवढे केस पिकलेत तेवढे आंदोलन छगन भुजबळांनी केलं
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : जेवढे केस पिकलेत तेवढे आंदोलन छगन भुजबळांनी केलं मराठा आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली शिंदे समिती रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सारथीला जेवढी निधी दिला, तेवढा ओबीसींसाठीच्या महाज्योतीला देखील द्या, असं देखील छगन भुजबळ म्हणाले. हिंगोलीत आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला..यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह मनोज जरांगेंविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. लायकी नसलेल्यांखाली आम्हाला काम करावं लागतं, या जरांगेंच्या विधानाचा भुजबळ यांनी खरपूस समाचार घेतला. महात्मा ज्योतिबा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अलीकडच्या काळात डॉ. एपीजे अब्दुल कलाम या सर्व महापुरुषांनी देशाची सेवा केली, यापैकी कुणाचीच लायकी नव्हती का, असा सवाल भुजबळांनी जरांगेंना विचारला.






















