Chhagan Bhujbal : मंत्रिपद हुकलं, केंद्रीय स्तरावर भुजबळांना कोणता जबाबदारी?
मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले छगन भुजबळ नाराज आहेत. मात्र त्यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी देण्यासाठी अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.. तसंच भुजबळांची भाजपात प्रवेश करण्याबाबत कोणतीही मागणी नसल्याचं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळांनी आज सागर बंगला गाठत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. आठ ते दहा दिवसांत तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी नाराज भुजबळांना दिलंय. तसंच भुजबळ हे फडणवीसांनी ३ जानेवारीला पुन्हा भेटणार आहेत.
भुजबळांची फडणवीसांशी भेट घडली असली.. तरी अद्याप राष्ट्रवादीचे प्रमुख नेते नाराज भुजबळांना भेटून त्यांची मनधरणी करताना दिसलेले नाहीत.. त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय.. भुजबळांच्या याच नाराजीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया..
भुजबळांच्या नाराजी बद्दल बोलायचं नाही पण त्यांना मंत्रिपद नाही दिलं ही वस्तुस्थिती असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. संघर्षाचा काळ असो की आनंदाची स्थिती भुजबळ साहेब नेहमीच शरद पवारांसोबत राहिले असं म्हणत सुप्रिया सुळेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.