Chandrahar Patil : शिवसेनेत मोठी उलथापालथ; शिंदेच्या गळ्यात ठाकरेंचा चंद्रहार
तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका दिला आहे। दोनवेळा महाराष्ट्र केसरी राहिलेले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। खुद्द सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे। येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे। तसंच तुमच्याकडे कोणाचीही राहण्याची इच्छा नाही। हिम्मत असेल तर पक्ष प्रवेश थांबवा असं आव्हान शिरसाट यांनी दिलंय। आधीकडेच रत्नागिरीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रहार पाटील आणि शिंदेंची भेट झालेली होती। त्यावेळी दोन्ही नेत्यांनी सोबत जेवणाचा आस्वाद देखील घेतला होता। तेव्हापासून चंद्रहार पाटील शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती। तुमचे कुंपण सगळयात जरा गेले साफ झालेलं त्याच्याकडे लक्ष नाही वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पहा ना? आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतो आणि येणाऱ्या तीस तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतो. चंद्रहार, चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतो. थांबवा हिम्मत असेल तर तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे ध्यानाच्या मनःस्थितीत नाही. दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या. तर आपण अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतच आहोत, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे। पक्ष सोडण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं. तर त्यांची एक पोस्ट पहा काय? माझ्या पक्ष प्रवेशाच्या बाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही. शिवसेना-शिंदे गटाकडून मला पक्ष प्रवेशाबाबत ऑफर आहे. पक्ष प्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही.























