CBSE Board Exam 2024 :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
CBSE Board Exam 2024 :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १० एप्रिल, तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत होणार आहे. सीबीएसईने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सीबीएसईने २०२२-२३च्या निकालावेळीच दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना विषयनिहाय, दिनांकनिहाय वेळापत्रकाची प्रतीक्षा होती.आता सीबीएसईने सविस्तर वेळापत्रक जाहीर केल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार सुमारे ५५ दिवस या परीक्षा चालणार आहेत. तसंच या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलं जाणार.