Bishnoi Gang Special Report : बिश्नोई गँगचा खतरनाक ऑनलाईन पसारा ?
Bishnoi Gang Special Report : बिश्नोई गँगचा खतरनाक ऑनलाईन पसारा ?
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या घडवून आणणारा गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा गेली काही वर्षे देशातील वेगवेगळ्या तुरुंगांमधे बंदिस्त असतानाही त्याची टोळी बाहेर सक्रिय आहे. त्यासाठी त्याने ऑनलाईन रिक्रुटमेंटचा मोठ्या चलाखीने उपयोग केलाय. बिश्नोई आणि त्याच्या टोळीच्या सोशल मीडियातील प्रतिमेला भुलून देशातील शेकडो तरुण त्याच्या टोळीत सहभागी होतायत आणि बिष्णोईच्या ऑनलाईन इशाऱ्यावरुन हत्या करत आहेत. अंडरवर्ल्डच्या या नव्या ऑनलाईन व्हर्जनवर प्रकाश टाकणारा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट.
बाबा सिद्दीकींची हत्या केल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलिसांनी गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकरला अटक केली आहे. तर शिवकुमार गौतम, मोहम्मद झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे या हत्येतील इतर आरोपी फरार झालेत. गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिष्णोईच्या सांगण्यावरुन त्यांनी ही हत्या घडवून आणल्याचे बोललं जातंय.
या आरोपींपैकी कुणीही लॉरेन्स बिष्णोईला कधी भेटलेलं देखील नाही. मात्र तरीही बिष्णोईच्या सांगण्यावरुन त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकींची हत्या केलीय. या आरोपींना लॉरेन्स बिष्णोईबद्द्ल माहिती मिळवली ती सोशल मीडियाच्या माध्यमातून. लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीकडून सोशल मीडियावर टाकले जाणारे लॉरेन्सचे फोटो आणि त्याच्याबद्दलच्या पोस्ट पाहून नुकतेच वयात आलेले असे तरुण बिष्णोईच्या जाळ्यात अडकताना दिसतात.