Bhandara- Gosikhurd Dam : भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले! 1 लाख 71 हजार क्यूसेक विसर्ग
Bhandara- Gosikhurd Dam : भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले! 1 लाख 71 हजार क्यूसेक विसर्ग भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या गोसेखुर्द धरणाची भंडाऱ्याच्या पवनीत निर्मिती करण्यात आली. मध्यरात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाचे जलाशय परिचलन परिक्षेत्र 243 दशलक्ष घनमीटर आहे. जुलै महिना अखेरपर्यंत 243 स्थलांक (दशलक्ष घनमीटर) साठा ठेवायचा असतो. सध्या 242.780 दशलक्ष घनमीटर पाणीसाठी आहे. जुलैं अखेरपर्यंत स्थलांकाच्या तुलनेत अजूनही धरणामध्ये 25 टक्के पाणीसाठा कमी आहे. सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचा फटका चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बसतो. त्यामुळं धरण प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोसीखुर्द धरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी...