Bengaluru Crime: बंगळुरुत महिलेने घेतला पोटच्या मुलाचा जीव,गोवा पोलिसांकडून कर्नाटक पोलिसांना माहिती
Bengaluru Crime: बंगळुरुत महिलेने घेतला पोटच्या मुलाचा जीव,गोवा पोलिसांकडून कर्नाटक पोलिसांना माहिती
माता न तू वैरिणी याचा प्रत्यय कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये आला. महिलेने गोव्यात आपल्याच चार वर्षांचा मुलाचा जीव घेतला आणि त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरुन कर्नाटकात परतली. संबंधित महिला ही बंगळुरुमधील एका स्टार्टअपची सीईओ आहे. ती आपल्या चार वर्षांच्या मुलासह गोव्याला गेली होती. तिथे जाऊन तिने मुलाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरुन कर्नाटकात परतली. महिलेने रुममधून चेकआऊट केल्यानंतर साफसफाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रक्ताचे डाग दिसले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. सूचना सेठ असं तिचं नाव आहे. गोवा पोलिसांनी याबाबत कर्नाटक पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी सूचना सेठला अटक केली. दरम्यान महिलेने मुलाची हत्या नेमकी का केली याचं कारण समजू शकलेलं नाही,