(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Belgaum : इंग्रजांच्या विरूध्द लढा दिलेल्या वीर राणी कित्तुर चन्नमाच्या उत्सवाला बेळगावात प्रारंभ
बेळगाव जिल्ह्यात फिरून कित्तुर येथे दाखल झालेल्या वीर ज्योतीचे मान्यवरांनी स्वागत करण्यात. कित्तुर गावच्या प्रवेशद्वारात असलेल्या वीर राणी कित्तुर चन्नमाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी वंदन केले. यावेळी कित्तुर संस्थानचा नंदी ध्वज फडकावण्यात आला आणि नंतर गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध कला पथकानी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मोर नृत्य पथक,हलगी पथक,केरळचे तेयम नृत्य पथक,चित्रविचित्र बाहुल्यांचे मुखवटे धारण केलेले पथक,महिलांचे झांज पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते.डोक्यावर कलश घेवून सुहासिनी देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते. कित्तुर उत्सवाच्या निमित्ताने वस्तू प्रदर्शन,छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कित्तुर उत्सवात विविध क्रीडा स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम आणि चर्चा सत्रांच आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस कित्तुर उत्सव चालणार आहे.