एक्स्प्लोर
Bachchu Kadu : आम्ही आवाहन केलं तर उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकतं- बच्चू कडू
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. 'शेतकरी रस्त्यावर उतरला तर तुमचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही', असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. कडू यांनी उद्या महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारण्याचा आणि चक्काजाम (Chakka Jam) करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिवारींच्या मते, बच्चू कडू यांचा डोळा राज्यमंत्री दर्जा असलेल्या शेतकरी स्वावलंबन मिशनच्या (Shetkari Swavalamban Mission) अध्यक्षपदावर आहे. 'बच्चू कडू हे चांगले कार्यकर्ते आहेत पण अज्ञानी आहेत, त्यांना कृषी संकटाचं ज्ञान नाही', अशी टीकाही तिवारी यांनी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















