Bachchu Kadu : पराभव समोर दिसत असल्यामुळे राणांचे दिनेश बूब यांच्यावर आरोप - बच्चू कडू
Bachchu Kadu : पराभव समोर दिसत असल्यामुळे राणांचे दिनेश बूब यांच्यावर आरोप - बच्चू कडू - पहिल्या टप्प्याचं मतदान काल झालं आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. ज्यामध्ये अमरावती लोकसभेचं ही मतदान होणार आहे.. सध्या सगळ्याच पक्षाचे उमेदवार गल्लीमध्ये जाऊन प्रचार करतांना दिसताय.. अमरावती लोकसभेत आमदार बच्चू कडू यांनी दिनेश बुब या शिवसैनिकाला उमेदवारी देऊन लढत चौरंगी केली.. नवनीत राणाच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडू मैदानात उतरले.. ग्रामीण भागात बच्चू कडू सकाळी 6 वाजेपासून रात्री 3 वाजेपर्यंत प्रचार करताय.. यावेळी बच्चू कडू यांनी एबीपी ाझाशी बोलतांना सांगितले की, राणाच्या परिवारामुळे राणा पडणार आहे.. काँग्रेस आणि भाजप हे पक्ष सत्तेत राहिलेले आहे पण यांनी लोकांसाठी काही फारसं केलेलं नाही असा आरोप ही बच्चू कडू यांनी केला...


















