Ind vs Eng 4th Test Jasprit Bumrah: इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली, चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही?; शुभमन गिलने दिली माहिती
Ind vs Eng 4th Test Jasprit Bumrah: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तेंडुलकर-अँडरसन मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरू होईल आणि 27 जुलैपर्यंत असणार आहे.

Ind vs Eng 4th Test Jasprit Bumrah: इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत (India vs England) भारताचा 22 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला (Ben Stokes) सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तसेच पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubhman Gill) महत्वाची अपडेट दिली आहे.
England win a thriller 🔥
— ICC (@ICC) July 14, 2025
Agony for India as they fall short by 22 runs.#WTC27 #ENGvIND 📝: https://t.co/0NCkPJdBEk pic.twitter.com/bD1MkrqvjZ
शुभमन गिल काय म्हणाला?
लॉर्ड्स कसोटीत भारताच्या पराभवानंतर जेव्हा भारतीय कर्णधार शुभमन गिलला जसप्रीत बुमराहबाबत प्रश्न विचारण्यात आला. जसप्रीत बुमराह पुढील कसोटी सामना खेळणार की नाही?, असा प्रश्न शुभमन गिलला विचारण्यात आला. यावर तुम्हाला लवकरच याबद्दल दिली जाईल, असं शुभमन गिल म्हणाला.
SHUBMAN GILL ON BUMRAH PLAYING THE 4TH TEST. 🗣️
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 14, 2025
"You'll get to know about it soon". pic.twitter.com/GmZPETV9tA
जसप्रीत बुमराह मँचेस्टर कसोटीत खेळणार की नाही?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तेंडुलकर-अँडरसन मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 जुलैपासून सुरू होईल आणि 27 जुलैपर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात आठ दिवसांचे मोठे अंतर आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांना विश्रांतीसाठी भरपूर वेळ आहे. अशा परिस्थितीत जर जसप्रीत बुमराहलाही विश्रांती मिळाली तर तो पुढील कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
जसप्रीत बुमराहची घातक गोलंदाजी-
लॉर्ड्स कसोटीत जसप्रीत बुमराहने उत्तम कामगिरी दाखवली. भारताने हा कसोटी सामना गमावला असला तरी टीम इंडियाची गोलंदाजी जबरदस्त होती. बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात पाच विकेट्स पटकावल्या. दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराहने दोन विकेट्स घेतल्या.
सामना कसा राहिला?
सामन्याचा प्रारंभ दोन्ही संघांनी सारख्याच ताकदीने केला होता. इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावांची दमदार खेळी केली, त्याला भारतानेही तितक्याच धावांनी म्हणजे 387 धावांनी प्रत्युत्तर दिलं. इंग्लंडने दुसऱ्या डावात भारतापुढे 193 धावांचं आव्हान उभं केलं, पण पाचव्या दिवशी एकामागोमाग एक विकेट्स कोसळल्या आणि भारताचा डाव अवघ्या 170 धावांवर आटोपला. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने भारताचा 22 धावांनी पराभव केला. रवींद्र जडेजाने भारताच्या विजयाच्या आशा बराच काळ जिवंत ठेवल्या, परंतु पराभवापासून वाचू शकला नाही.





















