करमाळ्यात भाजपच्या शहराध्यक्षावर खुनी हल्ला, कोयत्यासह काठ्यांनी केली मारहाण, गुन्हा दाखल
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर खुनी हल्ला झाला आहे.

Solapur Karmala Crime News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर खुनी हल्ला झाला आहे. आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कोयत्याने व काठ्याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. करमाळा पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात असून याबाबत करमाळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर खुनी हल्ला झाल्यानं शरह हादरलं आहे. कोयत्यासह काठ्यांनी जगदीश अग्रवाल यांना मारहाण करण्यात आली आहे. नेमकी एवढी मारहाण करण्याचे कारण काय? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. या घचटनेप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Pravin Gaikwad Attack : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणावरून नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले, सरकारने जनसुरक्षा कायदा आणला अन् आता...























