एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amol Mitkari On Uttam Jankar : उत्तम जानकरांच्या टोलेबाजीला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर

Amol Mitkari on Uttam Jankar: राज्याला आग लागल्यावर पळून गेलेला बिबट्या आता परत येऊन आग विझविणाऱ्या चिमण्यांची शिकार करण्याच्या तयारीत, त्याला घेऊ नका, असं वक्तव्य उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी करत अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली आहे. अशातच अता उत्तम जानकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. बिबट्या म्हणून उत्तम जानकरांनी त्यांनी सिद्ध केलं की, अजित पवार वाघ आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. तसेच, थोबाड आवरावं असं म्हणत मिटकरींनी जानकरांना फटकारलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, "राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तम जानकरांना चांगलंचं फटकारलं आहे. तसेच, कडक शब्दांत 'थोबाड़ आवारावं' असा इशारा दिला आहे. दरम्यान, माळशिरसचे माजी आमदार हनुमंत डोळस यांनी उत्तम जानकर यांच्याविरुद्ध एक लक्षवेधी लावली होती. लक्षवेधीवर उत्तर देताना तात्कालीन धर्मदाय आयुक्तांनी कागदपत्र सादर केले. त्यावर तत्कालीन गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलं होतं. म्हणजेच, हनुमंत डोळस यांनी उत्तम जानकरांना त्यांची जागा दाखवली आहे. आज तोच व्यक्ति अजित पवारांवर टिका करतोय, बिबट्या म्हणून त्यांनी सिद्ध केलं की अजित पवार हे वाघ आहेत."

काय म्हणाले उत्तम जानकर? 

काही दिवसांपूर्वी भाजपच्या अजगराचा विळखा देशाला आणि राज्याला पडला होता. कोणीही उघड बाहेर पडायला तयार नव्हतं. जंगलाला आग लागल्यावर आपला बिबट्याही 40 जणांना घेऊन पळून गेला होता. मात्र यावेळी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी चिमणी बनून आपल्या चोचित थेंब थेंब पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि मतदारांनी मतांचा पाऊस पडल्यानं ही आग विझली. आता हाच बिबट्या पुन्हा शिकारीला बाहेर पडायच्या तयारीत आहे. इकडे येऊन याच चिमण्यांची शिकार करणार असल्यानं त्याला येऊ देऊ नका, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या मागासवर्गीय सेलच्या कार्यक्रमात जानकर यांनी अजित पवार यांच्या प्रवेशाला विरोध करताना जोरदार टोलेबाजी केली.

आजही उत्तम जानकर हे अधिकृतपणे अजित पवार यांच्याच राष्ट्रवादीत असले तरी संपूर्ण लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजितदादा यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत बारामतीमध्ये देखील जोरदार प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपनं याच जानकर यांना आपल्या बाजूनं वळवण्यासाठी खास विमानाच्या वाऱ्या देखील घडवल्या. मात्र तरीही जानकर यांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत लोकसभेत राष्ट्रवादीच्या विजयात मोठा हातभार लावला होता. आता पुन्हा अजितदादा यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाल्यावर अस्वस्थ झालेल्या जानकरांनी पक्षाच्या मेळाव्यात पुन्हा एकदा थेट अजितदादा यांच्यावर निशाणा साधला. त्यांना पक्षात घेतलं तर, प्रामाणिकपणे पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, असे संकेत उत्तम जानकरांनी दिले आहेत. त्यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसादही दिल्याचं पाहायला मिळणार आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6 PM टॉप हेडलाईन्स 6 PM 26 November 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget