(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola ZP Panchayat Samiti By-election : अकोला झेडपीत त्रिशंकू निकाल, भाजपकडे लक्ष ABP Majha
अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या 14 जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज लागलेत. या निकालात सर्वाधिक सहा जागा जिंकत वंचित बहुजन आघाडीनं बाजी मारली आहे. मात्र, निर्भेळ सत्तेसाठीचा 27 हा 'मॅजिक फिगर' वंचितला गाठता आला नाही. या निवडणुकीत जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रेंचं गाव असलेल्या कुरणखेड गटात वंचितचा उमेदवार विजयी झाला आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या कुटासा गटात बच्चू कडूंच्या प्रहारचा उमेदवार विजयी झाला आहे. तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक अमानकर यांचा सख्खा पुतण्या त्यांचा गृहमतदारसंघ असलेल्या शिर्ला मतदारसंघातून पराभूत झाला आहे.
तर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 28 जागांपैकी वंचितनं 16 जागा जिंकत बाजी मारली आहे. या निवडणुकीत वंचितच्या पाच जागा वाढल्यात. तब्बल पाच पंचायत समित्यांवर वंचितची सत्ता अबाधित राहणार आहे. पंचायत समित्यांमध्ये शिवसेना पाच, भाजप तीन आणि काँग्रेस, प्रहार, एमआयएम आणि वंचितनं प्रत्येकी एक जागा जिंकली.