Ajit Pawar vs Supriya Sule : दादा-ताईंमधअये तू तू मै मै सुरुच,अजित पवारांच्या टिकेला उत्तर ABP MAJHA
पुणे : खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्याच्या ताई आणि दादा यांच्या तू तू मै मै सुरुच असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अजित पवार यांनी संसदेत भाषण देऊन उपयोग नाही. गावागावात फिरावं लागतं आणि त्यासोबतच सेल्फी काढत असल्याची टीका सुप्रिया सुळेंवर केली होती. त्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लोकसभेत आम्हाला मुद्दे मांडण्यासाठी निवडून दिलं आहे. अनेक मोठ्या लोकांनी संसदेत भाषणं केली असल्याचं त्यांनी खड्या शब्दांत सांगितलं. फॅमिली दिल से बनती है! पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं मात्र याचवेळी त्यांनी अजित पवारांना टोगा लगावण्याची एकही संधी सोडली नाही. अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीच्या एका कार्यक्रमात पवार कुटुंबियांनी मला एकटं सोडलं तरी तुम्ही मला एकटं सोडू नका, अशी भावनिक साद घातली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी सगळे लोक माझी फॅमिली आहे. शेजारी बसलेल्या लोकांकडे हात दाखवून हे देखील माझं कुटुंब असल्याचं त्या म्हणाल्या आणि फॅमिली दिल से बनती है म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.