Rupali Chakankar : हॉटेलमध्ये दीड हजारांची टीप देणाऱ्यांना पैशांची किंमत काय कळणार? रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Rupali Chakankar vs Supriya Sule : तुम्ही दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींचा अपमान केला आहे. तुम्ही जाहीररित्या माफी मागितली पाहिजे, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
Rupali Chakankar on Supriya Sule : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढत होत असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. आता माढ्यातील महायुतीच्या सभेतील भाषणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळेंवर टीका
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. यावरून रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली. काँग्रेसवाल्यांनी तर सांगितले की आम्ही सत्तेत आलो की पहिले ही योजना बंद करू. मला प्रश्न पडला की, इतकी चांगली योजना आहे. महिलांना दीड हजार रुपये मिळत आहे. पण ही योजना सगळ्यांना का बंद करायची आहे? तुतारीच्या खासदार बोलल्या दीड हजारामध्ये काय होतं? वांग्याच्या शेतामधून कोट्यावधी उत्पन्न घेणाऱ्यांना, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या आणि हॉटेलमध्ये दीड हजार रुपयांची टीप देणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार? असा हल्लाबोल त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केला.
तुतारीचा उमेदवार पाडायचा
रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, ही तुमची कोणती मानसिकता आहे. तुम्ही दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींचा अपमान केला आहे. तुम्ही जाहीररित्या माफी मागितली पाहिजे. कारण एका भावाने बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे. तिला आर्थिक सक्षम करण्यासाठी दिलेली ही ओवाळणी आहे. त्याची तुलना तुम्ही विकत घेण्यापासून तर बहिणीच्या नात्यापर्यंत करताय. हा आमच्या आत्मसन्मानाचा झालेला अपमान आहे. तुतारीवाले तुमच्या विरोधात आहेत. तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून ते विरोध करत आहेत, कोर्टात जात आहेत. तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवत आहेत. त्यामुळे जिथे जिथे तुतारीचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात आपल्याला मतदान करायचे आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.
आणखी वाचा
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य