Ajit Pawar : अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख - अजित पवार
Ajit Pawar : अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख - अजित पवार राज्यात 'माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सत्ताधाऱ्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर त्याला वारंवार सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिल्याचं दिसून येत आहे. तर 'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत आणि टीका करत आहेत, त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत विरोधकांना उत्तर दिलं आहे. आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांनी लिहलं आहे की,"माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे." 'माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित…