एक्स्प्लोर

Ajit Pawar NCP List : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

Ajit Pawar NCP List :  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता 

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. महायुतीतील (Mahayuti)  मोठा पक्ष आलेल्या भाजपने बाजी मारताना (BJP First Candidate List for Maharashtra Assembly Election 2024) पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 13 महिला सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत.  असे असताना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar)  गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी (Ajit Pawar NCP First Candidate List for Maharashtra Assembly Election 2024) आज संध्याकाळ पर्यंत जाहीर  करणार असल्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीत 32- 35 नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.  शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उमेदवारांची यादी सुद्धा आजच येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये 50 उमेदवार असतील असे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून बंडाळी केल्यानंतर त्यावेळी साथ दिलेल्या सर्वच आमदारांना पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं जाईल असं बोललं जात आहे. अजित पवार यांच्याकडूनही यादी लवकरात लवकर जाहीर केली जाईल असं बोललं जात आहे. दरम्यान, भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये मराठवाडामध्ये 16 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये आता भोकर या मतदारसंघाची वाढ झाल्याने एकूण 17 ठिकाणी भाजप उमेदवार असतील. यामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई येथून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. मागीलवेळी येथून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. छत्रपती संभाजी नगरमधून फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याने त्या ठिकाणी भाजपकडून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 October 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 04 PM टॉप हेडलाईन्स 04 PM 21 ऑक्टोबर 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 October 2024Sanjay Raut Full PC : ...तर ती एका बापाची अवलाद नाही! संजय राऊत कुणावर भडकले? ABP MAJHANitin Raut On MVA Vidhan Sabha Candidate : काँग्रेस आपल्या जागा कायम ठेवण्यात यशस्वी होईल #abpमाझाAjit Pawar NCP List :  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
Maharashtra Assembly Elections 2024 : मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
Embed widget