एक्स्प्लोर
Pawar-Padalkar Controversy | पडळकरांचे आरोप फेटाळले, म्हणाले 'मला अडकवण्याचा प्रयत्न, SIT करा!'
अभिषम पडळकर आणि मारहाण झालेल्या शरणू खांडेने रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण कुणालाही फोन केलेला नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांना रात्री अपहरण करून हत्या करण्याचा प्रयत्न झाला आणि याचे मास्टरमाइंड रोहित पवार आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, आरोप तर ते करणारच, कारण मी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे सकट बोलत आहे आणि सरकारची अडचण केली आहे. काल मी फोन केला असे ते म्हणत आहेत, पण मी छत्रपती संभाजीनगरला होतो, नंतर वाशीमला आलो आणि आज अमरावतीला आलेलो आहे. मी कुठेही कुणाशी अजूनपर्यंत फोनवर बोललेलो नाही. व्हिडिओ कॉलबद्दल ते बोलले, मी माझ्या घरच्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलत नाही तर हा कोण लागून गेलाय जो व्हिडिओ कॉलवर त्या ठिकाणी मी बोलायला. जोही व्यक्ती कायदा व व्यवस्था हातात घेतो, त्यांच्या बाजूला आम्ही राहत नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. रोहित पवार यांनी गृह विभागाकडे एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. "एसआयटी फॉर्म करा. मी मागणी करतो एसआयटी फॉर्म करा, खरं काही लोकांसमोर तिथे आलं पाहिजे," असे त्यांनी म्हटले. मला अडकवण्याचा प्रयत्न होत असून, मी सरकारच्या विरोधात बोलतच राहणार असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम




















