एक्स्प्लोर

ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेनं नियम बदलला, खात्यात किमान 50 हजार रुपये शिल्लक ठेवावे लागणार, नियम कुणाला लागू?

ICICI Bank MAB : आयसीआयसीआय बँकेनं बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्यासंदर्भातील नियम बदलले आहेत. यामुळं खातेदारांना मोठी रक्कम बँकेत ठेवावी लागणार आहे.

मुंबई : आयसीआयसीआय बँक हे देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील बँक आहे. बँकेनं बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक रक्कम किती ठेवायची याबाबतचे नियम बदलले आहेत. तब्बल पाच पट वाढ केल्याचं समोर आलं आहे.  हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात आलेले बदल 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडण्यात आलेल्या बँक खात्यांना लागू असतील. यामुळं सर्वाधिक मिनिमम सरासरी शिल्लक रक्कम ठेवण्यामध्ये आयसीआयसीआयनं नवा मापदंड निर्माण केला आहे. नव्या बदलांनुसार आयसीआयसीआय बँकेच्या मेट्रो आणि  शहरी भागातील खात्यात आता 50000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 10 हजार रुपये इतकी होती. 

निमशहरी भागातील शाखेतील बँक खात्यासाठी किमान सरासरी शिल्लक 5000 रुपयांवरुन 25000 रुपये करण्यात आली आहे. तर, ग्रामीण भागातील खात्यांसाठी किमान शिल्लक 2500 रुपयांवरुन 10000 रुपये करण्यात आली आहे. जे बँक खातेदार किमान सरासरी शिल्लक रक्कम त्यांच्यात खात्यात ठेवणार नाहीत त्यांना बँकेकडून 6 टक्के दंड किंवा 500 रुपये जी कमी रक्कम असेल तितकं शुल्क आकारलं जाईल. समजा एखाद्या मेट्रोमधील बँक खातेदाराच्या बँकेत 50 हजार रुपये शिल्लक ठेवण्यास 10000 रुपये कमी पडत असतील तर दंड 600 रुपये होतो. मात्र, किमान दंड 500 रुपये द्यावा लागेल. 

बँकेनं रोख रक्कम जमा करण्यासंदर्भातील नियम देखील बदलले आहेत. तीन वेळा  कोणत्याही शुल्काशिवाय रक्कम जमा करण्यात दरमहा जमा करण्यात येईल, त्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत असेल. यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये आकारले जातील. किंवा एक हजारांसाठी 3.50 रुपये जे अधिक असेल ते आकारलं जाईल. चेक परत पाठवण्याची फी 200 रुपये निश्चित करण्यात आली आहे. चेक परत घेण्यासाठी 500 रुपयांचं शुल्क आकारलं जाईल. 

एचडीएफसी बँकेनं किमान सरासरी शिल्लक रक्कम मेट्रो आणि शहरी भागासाठी 10 हजार रुपये ठेवलं आहे. तर, निमशहरी शाखांसाठी 5000 आणि ग्रामीण शाखांसाठी 2500 रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियानं किमान शिल्लक रक्कम शुल्क 2020 पासून रद्द केलं आहे. अनेक बँकांची किमान शिल्लक रक्कम 2000 ते 10 हजार रुपयांदरम्यान  आहे. स्टेट बँकेनंतर काही बँकांनी किमान शिल्लक रक्कम शुल्क रद्द केलं आहे.  आयसीआयसीआय बँकेच्या या नियम बदलाचा फटका किंवा परिणाम विद्यमान खातेदारांवर होणार नाही. जे नव्यानं खातं उघडणार आहेत त्यांना इतकी रक्कम खात्यात शिल्लक ठेवावी लागेल. बँकेचा श्रीमंत ठेवादर सोबत ठेवण्याचा या निमित्तानं प्रयत्न दिसतो. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Embed widget