एक्स्प्लोर

BJP on Sharad Pawar : विधानसभेपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर, शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

BJP on Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी आपली भेट घेतली होती आणि 160 जागा जिंकून देण्याची हमी दिल्याचा सनसनाटी दावा शरद पवार यांनी केला आहे.

BJP on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेतली होती आणि 160 जागा जिंकून देण्याची हमी दिली होती. मात्र, निवडणूक आयोगावर कोणतीही शंका नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच, त्या दोघांची भेट राहुल गांधी यांच्यासोबतही घालून देण्यात आली होती. मात्र आम्ही दोघांनीही लोकांमध्ये जाऊन जो निर्णय जनतेचा असेल तो मान्य करण्याचे ठरवले आणि त्या व्यक्तींनी दिलेल्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, असे देखील शरद पवार यांनी म्हटले. आता शरद पवारांच्या सनसनाटी दाव्यावर भाजपची (BJP) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, अत्यंत बालिश आणि हास्यास्पद असे दावे आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे. पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचे दावे करणे हे खरंच आश्चर्यकारक आहे. जर आपल्याकडे अशा प्रकारची दोन माणसं आली होती तर तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला किंवा संबंधित यंत्रणांना तक्रार का केली नाही? उलट आपण त्या लोकांना घेऊन राहुल गांधी यांच्याकडे गेला. याचा अर्थ तुमचा उद्देश राहुल गांधींशी चर्चा करून अशा गोष्टींना समर्थन देण्याचा विचार होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

त्या दोन व्यक्तींची चौकशी व्हावी

राहुल गांधी यांची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी हे अत्यंत विचलित झालेले आहेत. त्या हतबलतेतून अशा प्रकारच्या गोष्टी पुढे येत आहेत? लोकसभेला निकाल तुमच्या बाजूने लागला, त्यावेळेला आम्ही म्हणायचे का की अशाच प्रकारच्या कुठल्या गोष्टींचा आपण आधार घेतला. विधानसभेला आपल्याला शक्य झाले नाही. हे त्यांचे वक्तव्य कुणालाही पटणारे नाही. ज्यावेळी तुमच्याकडे माणसे आले तुम्ही त्याच वेळेस तक्रार का दाखल केली नाही? या दोन व्यक्ती कोण आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे, असे देखील प्रवीण दरेकर म्हणाले.  

शरद पवार इतक्या उशिराने बोलल्याचे आश्चर्य

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, हा सगळा भंपकपणा आहे. लोक इतके पण मूर्ख नाहीत. महाविकास आघाडीला आता केंद्र सरकार, राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीपुढे जात आहे, त्याचं पोटशूळ आहे. त्यातूनच अशा खळबळजनक गोष्टी काढून जनतेला काही संभ्रमित करता येतं का? असे सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि शरद पवार यांच्यासारखा नेता इतक्या उशिरा बोलतोय याचे आश्चर्य वाटते, असे त्यांनी म्हटले. 

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मला आठवतंय की, विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं की, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती, असे लोक भेटत असतात. पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु, असं आम्ही ठरवल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. 

आणखी वाचा 

Sharad Pawar : ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडियात कुणाला आक्षेप नाही, संजय राऊत यांच्या दाव्यावर शरद पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Vijay Kumbhar MPSC Protest: MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही, मात्र चौकशी तरी करता येते का?; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची A टू Z माहिती
MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही, मात्र चौकशी तरी करता येते का?; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची A टू Z माहिती
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
Embed widget