Ajit Pawar Baramati : बारामतीत अजित पवारांच्या प्रचारासाठी रिक्षा सजल्या
Ajit Pawar Baramati : बारामतीत अजित पवारांच्या प्रचारासाठी रिक्षा सजल्या
हेही वाचा :
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती, उमेदवारांच्या नावांची. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून पुढील 2 ते 3 दिवसांत जागावाटप जाहीर होईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातही 4 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. तर, वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेत आत्तापर्यंत तब्बल 51 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे, आता इच्छुकांची गर्दी पक्षश्रेष्ठींकडे लागली असून शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान आमदारांनाही कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महायुतीमध्येही विद्यमान आमदारांची जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. त्यामुळे, संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) 41 संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती आली असून नवाब मलिक यांचेही नाव या यादीत आहे. अजित पवार हे निवडणूक लढणार की नाही, बारामतीमधून अजित पवार दुसरा उमेदवार देणार का, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य यादी हाती आली असून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीमधूनच उमेदवार असतील, असेच दिसून येते. राष्ट्रवादीच्या संभाव्य विधानसभा उमेदवार आणि त्यांच्या मतदारसंघाची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये, अजित पवार हे बारामतीमधून उमेदवार आहेत. तर, नवाब मलिक यांनाही शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगणारे आमदार प्रदीप सोळुके यांच्या माजलगाव मतदारसंघात त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव समोर आले आहेत. त्यामुळे, यंदा माजलगाव मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील.