(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Crisis Leaders Reaction : अजित पवार- शरद पवार भेटीला, नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
अजित पवारांसह त्यांच्या गटाने अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. आणि दिलगिरी व्यक्त केली. देवगिरीवरील बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते अचानक वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला आले. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. आजची ही घडामोड अनपेक्षित होती. आणि यातून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागू शकेल, अशी शक्यता सांगितली जातेय. दरम्यान, आपल्याला पुरोगामी विचार घेऊन पुढे जायचंय, असं वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या युवकांना मार्गदर्शन करताना केलंय. त्याचसोबत, पवारांच्या भूमिकेत कसलाही संभ्रम नाही, शरद पवारांच्या भूमिकेत बदल नसून, ते विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. त्यामुळे, अजित पवार गटाचे मनोमीलनाचे प्रयत्न तूर्तास तरी निष्फळ ठरल्याचं बोललं जातंय.