ABP Majha Reality Check Hospital : सरकारी रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआयसाठी महिनोमहिने प्रतीक्षा
ABP Majha Reality Check Hospital : सरकारी रुग्णालयांत सीटी स्कॅन, एमआरआयसाठी महिनोमहिने प्रतीक्षा
केईएम, सायन, नायर.. जी.टी., सेंट जॉर्ज, जेजे या मुंबईतल्या नामवंत पालिका सरकारी रुग्णालयात केवळ महाराष्ट्रातूनच नाही परराज्यातूनही मोठ्या संख्येनं रुग्ण येतात...
इथल्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक यंत्रणा म्हणजे रुग्णांसाठी संजीवनीच...पण जेव्हा एबीपी माझाने या रुग्णसेवेचा रिऍलिटी चेक केला, तेव्हा तर धक्कादायक वास्तव समोर आलं...मुंबईतल्या या नामवंत सरकारी रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या चाचणीसाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागतेय...कारण, बिघडलेल्या मशिन किंवा रुग्णांच्या संख्येत तुलनेने कमी असलेल्या मशिन...या रुग्णालयांमध्ये नवीन मशीनसाठी प्रस्ताव दिला असला, तरी त्याला लालफिताशाहीचा फटका बसत असल्याची माहिती पालिकेने दिलीय.. राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या अर्थ संकल्पात आरोग्य विभागासाठी करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या तरतूदीचा वापर नेमका होतो कुठे? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.